भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव भक्त दोनी करिताती काला । तयांच्या सुखाला वर्णी कवण

dev bhakta doni karitati kala | tayanchya sukhala varni kavan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव भक्त दोनी करिताती काला । तयांच्या सुखाला वर्णी कवण ॥१॥ धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनांचें । ठेवणें सदाशिवाचें खेळतसे ॥२॥ उच्छिष्ट तें काय खाय तयाचेनी होतें । नाहींकंटाळत तयालागीं ॥३॥ एका जनार्दनीं भक्तांची आवडी । वाढवीत गोडी नित्य नवी ॥४॥