भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव भक्त दोन्हीं तीर्थ क्षेत्र नाम । ऐसा एक संभ्रम कोठें नाहीं

dev bhakta donhin tirtha kshetra nam | aisa ek sambhram kothen nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव भक्त दोन्हीं तीर्थ क्षेत्र नाम । ऐसा एक संभ्रम कोठें नाहीं ॥१॥ प्रयागादी तीर्थ पहाती पाहतां । न बैसे तत्त्वतां मन माझें ॥२॥ पंढरीची ऐसा आहे समागम । म्हणोनि भवभ्रम हरलासे ॥३॥ एका जनार्दनीं पाहतां विठ्ठल देव । फिटला तो भेव संसाराचा ॥४॥