भजनी मालिका
← भजनांकडे परत

देश काळ वर्तमान । तया नाढळेचि भिन्न

desh kal vartaman | taya nadhalechi bhinna

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देश काळ वर्तमान । तया नाढळेचि भिन्न ॥१॥ जया कृपावंत माय । विठाई कवळुनी राहे ॥२॥ आपुलें पारिखें । नेणती ते इच्छा सुखें ॥३॥ निळा म्हणे केली । ओळखी ठायींची ते भली ॥४॥