भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखोनियां संतमेळा । कीर्तन सोहळा धांव घाली

dekhoniyan santamela | kirtan sohala dhanv ghali

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देखोनियां संतमेळा । कीर्तन सोहळा धांव घाली ॥१॥ ऐकावया आपुलीं नामें । गुणसंभ्रमें नित्य नवे ॥२॥ बैसोनियां प्रेम वांटी । नाचे परवडी मग सवें ॥३॥ निळा म्हणे आपुल्या सुखें । वांटी हारिखें भुक्ति मुक्ति ॥४॥