भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखोनिया देवभक्त । सनकादिक आनंदात

dekhoniya devabhakta | sanakadik anandat

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देखोनिया देवभक्त । सनकादिक आनंदात ॥१॥ म्हणती जावें पंढरपुरा । पाहूं दीनांचा सोयरा ॥२॥ आनंदें सनकादिक । पाहूं येती तेथें देख ॥३॥ विठ्ठलचरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥