भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखोनि कीर्तनाची गोडी । देव धांवे लवडसवडी

dekhoni kirtanachi godi | dev dhanve lavadasavadi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देखोनि कीर्तनाची गोडी । देव धांवे लवडसवडी ॥१॥ वैकुंठीहुनि आला । कीर्तनींतो सुखें धाला ॥२॥ ऐसा कीर्तनाचा गजर । देव नाचतासे निर्भर ॥३॥ भुलला कीर्तनीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥