भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखिलें कंदर्पाच्या बापा । आम्हीं नेणों पुण्य पापा

dekhilen kandarpachya bapa | amhin nenon punya papa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देखिलें कंदर्पाच्या बापा । आम्हीं नेणों पुण्य पापा ॥१॥ कैंचे पाप कैंचे पुण्य । देह नामें पडलें शून्य ॥२॥ शुन्य म्हणताती बिंदुलें । तेंचि विश्वाकार झालें ॥३॥ एका शुन्याचा विस्तारु । जनार्दनींक जगदाकारु ॥४॥