भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखती लोचनीं । निजात्मया अनुदिनीं

dekhati lochanin | nijatmaya anudinin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देखती लोचनीं । निजात्मया अनुदिनीं ॥१॥ त्यांच्‍या भाग्याचा तो महिमा । नेणे चतुर्मुख ब्रम्हा ॥२॥ हरीसंगें हरिचेंचि रुप । झाली भावना तद्रुप ॥३॥ निळा म्हणे अवलोकनें । तैसेचि झालें अंगे मनें ॥४॥