भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखतांचि विटेवरीं । समान पाउलें साजिरीं

dekhatanchi vitevarin | saman paulen sajirin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देखतांचि विटेवरीं । समान पाउलें साजिरीं ॥१॥ माझें लांचावलें मन । नुठी बैसलें वरुन ॥२॥ न सुटे मुंगीयेसी गुळ । जेवीं भ्रमरा आमोद कमळ ॥३॥ निळा म्हणे तैसें झालें । मक्षिकें मोहळें गोविलें ॥४॥