भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहूडे ठाण सुकुमार गोजिरें । कल्पद्रुमातळीं उभा देखिलारे

dehude than sukumar gojiren | kalpadrumatalin ubha dekhilare

रचनाकार: संत सेना · अभंग
देहूडे ठाण सुकुमार गोजिरें । कल्पद्रुमातळीं उभा देखिलारे ॥१॥ मनीं वेध लागला त्या गोपाळाचा। जो जिवलग गोपगोपिकेचा ॥२॥ जी सावळी सगुण घनानंद मूर्ति। पाहतां वेधली माझी चित्तवृत्ती ॥३॥ जो उभाचि राहिला व्यापुनी सकळ। भेटिलागींसेना व्हावी उतावळी ॥४॥