भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहींच्या अवसाना । कोणी कामा नये कोण्हा

dehinchya avasana | koni kama naye konha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देहींच्या अवसाना । कोणी कामा नये कोण्हा ॥१॥ हे तो मिळाले अपार । अवघा मायेचा बाजार ॥२॥ तुजसाठीं शोक । कोण्ही न करतीच दुःख ॥३॥ रडती पडती । पुढें कैसें होईल म्हणती ॥४॥ आपुलीया हिता । रडती जना देखतां ॥५॥ याचे मानूं नको खरें । एका जनार्दनीं त्वरें ॥६॥