भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहींची वासना अद्वैत निमालें । साधन साधिलें तोचि धन्य

dehinchi vasana advait nimalen | sadhan sadhilen tochi dhanya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देहींची वासना अद्वैत निमालें । साधन साधिलें तोचि धन्य ॥१॥ द्वैताचा भाव अद्वैताचा ठाव । आठवा स्वयमेव नेणें कांहीं ॥२॥ एका जनार्दनीं अद्वैता वेगळा । राहिला निराळा सुखरुप ॥३॥