भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहीं असोनियां देव । वाउगा करिती संदेहो

dehin asoniyan dev | vauga kariti sandeho

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देहीं असोनियां देव । वाउगा करिती संदेहो ॥१॥ जाय देवळासी स्वयें । मनीं आशा दुसरी वाहे ॥२॥ बैसोनीं कीर्तनीं । लक्ष लावी सदां धनीं ॥३॥ करुं जाय तीर्थयात्रा । गोविलें मन विचारा ॥४॥ ऐशियासी न भेटे देव । एका जनार्दनीं नाही भाव ॥५॥