भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहीं असोनी विदेही । चाले बोले सदा पाही

dehin asoni videhi | chale bole sada pahi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देहीं असोनी विदेही । चाले बोले सदा पाही ॥१॥ असे अखंड समाधी । नसे कांहीं आधिव्याधी ॥२॥ उपाधीचे तोडोनी लाग । देहीं देहपणें भरिलें जग ॥३॥ एका जनार्दनीं संग । सदा समाधान सर्वाग ॥४॥