भजनी मालिका
← भजनांकडे परत

देही धर्म विहित करी । अद्वैत भाव चित्तीं धरी । सर्वभावे नमस्कारी । एक आत्मा म्हणोनी

dehi dharma vihit kari | advait bhav chittin dhari | sarvabhave namaskari | ek atma mhanoni

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देही धर्म विहित करी । अद्वैत भाव चित्तीं धरी । सर्वभावे नमस्कारी । एक आत्मा म्हणोनी ॥१॥ तेणें तुटे रे बंधन । वाचे जपे जनार्दन । आणिक नको रे साधन । रामकृष्ण स्मर सुखें ॥२॥ पवित्र त्याचें हे कुळ । आचार त्याचाचि सुशीळ । अखंड जे सर्वकाळ । नाम जपती ॥३॥ एका जनार्दनीं नाम । परब्रह्मा तें निष्काम । हरे भवश्रम । जन्मजराव्याधी ॥४॥