भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहनिशा क्रमोनि मी तंव आलिये । इहीं वैष्णवीं आणिलें पंढरीये

dehanisha kramoni mi tanv aliye | ihin vaishnavin anilen pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देहनिशा क्रमोनि मी तंव आलिये । इहीं वैष्णवीं आणिलें पंढरीये ॥१॥ बाई वो मन ध्यान लागलें पंढरीचे । तें तंव जागृती स्वप्नी नवचे ॥२॥ नयन नाच्ती सुखाचा हा गोंधळू । साचे सन्मुख देखोनि श्रीविठ्ठल ॥३॥ आनंदु आसमाय होतीं मना पोटीं । नवल वालभों विठ्ठली जालीं भेटीं ॥४॥ मी आन न देखें वो नाइकें काणीं । ठासा ठसावला अभिन्नपणीं वो ॥५॥ जनीं न संता संचारू जाला देखा । एका जनार्दनीं धरिला एकी एका वो ॥६॥