भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहाचिये माथां काळाची तों सत्ता । म्हणोनि सर्वथा घोका राम

dehachiye mathan kalachi ton satta | mhanoni sarvatha ghoka ram

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देहाचिये माथां काळाची तों सत्ता । म्हणोनि सर्वथा घोका राम ॥१॥ आदि मध्य अंतीं काळ लागलाहे । क्षणक्षणां पाहे वास त्यासी ॥२॥ सर्व जाणोनियां अंधळें पैं होती । काळ नेतांचि देखतो ते दुजा ॥३॥ परि रामनामीं न धरिती विश्वास । निकट समयास धांवाधांवी ॥४॥ एका जनार्दनीं भुलले ते प्राणी । तया सोडवाणी कोण करी ॥५॥