भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहाची आशा टाकिली परती । केलीसे आरती प्रपंचाची

dehachi asha takili parati | kelise arati prapanchachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देहाची आशा टाकिली परती । केलीसे आरती प्रपंचाची ॥१॥ स्थूल सुक्ष्म यांची रचूनियां होळीं । दावाग्नि पाजळीं भक्तिमंत्रें ॥२॥ एका जनार्दनीं देहासी मरण । विदेहीं तो जाण जनार्दन ॥३॥