भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहबुद्धी खुंटली येथें माया तुटली । देहाची स्थिती दैवाधीन ठेली

dehabuddhi khuntali yethen maya tutali | dehachi sthiti daivadhin theli

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देहबुद्धी खुंटली येथें माया तुटली । देहाची स्थिती दैवाधीन ठेली ॥१॥ दैवाचेनी बळें देहींचे कर्म चळे । स्वसुखाचे सोहळे विदेह भावें ॥२॥ भोगी कां त्यांगी अथवा हो योगी । देहीं देहपण न लगे त्याच्या अंगीं ॥३॥ एका जनार्दनीं एकपणाच्या तुटी । सहज चैतन्यासी मिनला उठाउठी ॥४॥