भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहबुद्धि जयापाशीं । पाप वसे त्या मानसीं

dehabuddhi jayapashin | pap vase tya manasin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देहबुद्धि जयापाशीं । पाप वसे त्या मानसीं ॥१॥ दोष जाण अलंकार । तेणें सत्य हा संसार ॥२॥ समूळ अहंतेच्या नाशीं । ब्रह्माप्राप्ति होय त्यासी ॥३॥ एकाजनार्दनीं अहंकार । त्याग करावा सत्वर ॥४॥