भजनी मालिका
← भजनांकडे परत

दाता तोचि म्हणावा । नामावांचोनि नेणें जीवा

data tochi mhanava | namavanchoni nenen jiva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दाता तोचि म्हणावा । नामावांचोनि नेणें जीवा ॥१॥ थोर तोचि म्हणावा । नेणें भूताचा तो हेवा ॥२॥ लहान तोचि म्हणावा । काया वाचा भजे देवा ॥३॥ एका जनार्दनीं म्हणे । देवावांचुनी कांहीं नेणें ॥४॥