भजनी मालिका
← भजनांकडे परत

दामशेटी म्हणे ऐवजाचा धनी । आणिला तो मजलागुनी दावी आतां

damasheti mhane aivajacha dhani | anila to majalaguni davi atan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दामशेटी म्हणे ऐवजाचा धनी । आणिला तो मजलागुनी दावी आतां ॥१॥ वंदुनी चरण म्हणे चला आंत । जगीं हें प्रख्यात करुं नका ॥२॥ एका जनार्दनीं बोलोनियां मात । धरियेला हात वडिलांचा ॥३॥