भजनी मालिका
← भजनांकडे परत

चुचकारुनि गोधनें बैसविलीं आखरीं । म्हणती याहो श्रीहरी खेळों आतां

chuchakaruni godhanen baisavilin akharin | mhanati yaho shrihari khelon atan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
चुचकारुनि गोधनें बैसविलीं आखरीं । म्हणती याहो श्रीहरी खेळों आतां ॥१॥ धावतीं वोढाळें आवरिलीं सकळें । झालों तुझिया बळें बळीवंत ॥२॥ नाचवीसी तैसे नाचों सुखें आतां । काळाचिया माथां ठेवूनि पाय ॥३॥ निळा म्हणे केलों सांगाती दैवाचे । देऊनि सुखाचें भोजन आजी ॥४॥