भजनी मालिका
← भजनांकडे परत

चोरासी खंडन करावें हाचि धर्म । आणीक नाहीं वर्म दुजें कांहीं

chorasi khandan karaven hachi dharma | anik nahin varma dujen kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चोरासी खंडन करावें हाचि धर्म । आणीक नाहीं वर्म दुजें कांहीं ॥१॥ माझ्या विठोबाची आज्ञा पैं मोडिली । शपथ पाळिलीं नाहीं दुष्टे ॥२॥ घेऊनियां शस्त्र केलें पैं ताडन । खंडिले कर जाण उभयतां ॥३॥ एका जनार्दनीं करितां सुपरीत । तों घडलें विपरीत स्त्रियेसीं हें ॥४॥