भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिरें आणूनियां वेंष्टलें । गोवळ अवघेचि शृंगारले । येरेयेरां म्हणती भले । गौरव घ्या रे मामाचा

chiren anuniyan venshtalen | goval avaghechi shrungarale | yereyeran mhanati bhale | gaurav ghya re mamacha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
चिरें आणूनियां वेंष्टलें । गोवळ अवघेचि शृंगारले । येरेयेरां म्हणती भले । गौरव घ्या रे मामाचा ॥१॥ चिरें गुंडिती माजेसी । उंच पटके ते पायासी । झगे वेष्टूनियां शिरासी । विजारा टाकिती खांदयावरी ॥२॥ ऐसे शृंगारिले गोवळ । पुढें चालिले भार सकळ । तंव ते धनुरयागींचे वीर प्रबळ । घ्या घ्या म्हणोनी धांविले ॥३॥ कृष्णें बळरामें देखिलें । अवघ्यांपुढे मग ते झाले । धनुर्धारी वेग केले । परि तें न चले बळ त्यांचे ॥४॥ घ्या घ्या म्हणोनी हांका देती । शंकस्फुरणें ठाईंचि करिती । परी ते गोवळची समस्तीं । वेष्टूनियां घेतले ॥५॥ धनुष्या लाऊनि बाण । विंधावे तों माजि शिरोन । गोवळीं घेतली ते हिरोन । आणि मोडुनी सांडिली ॥६॥ निळा म्हणे एक एका । नपुरतीची युध्द तबका ॥ निपातिले फेडिली शंका । आणि पुढें संचरले ॥७॥