भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिंतनें गणिका निजपदा । चिंतने अजामेळ तोहि सदा । बैसविला आपुले पदा । चिंतनेची सर्वथा

chintanen ganika nijapada | chintane ajamel tohi sada | baisavila apule pada | chintanechi sarvatha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चिंतनें गणिका निजपदा । चिंतने अजामेळ तोहि सदा । बैसविला आपुले पदा । चिंतनेची सर्वथा ॥१॥ चिंतनें उद्धरी सर्वथा । न म्हणे यातिकुळ कुपात्रा । चिंतनें तारी सर्वत्रा । प्राणिमात्रा जगासी ॥२॥ पुराणें डांगोरा पिटती । चिंतनें उद्धार सर्व गती । न लगे नेम नाना युक्ति । नाम चिंता श्रीरामाचें ॥३॥ एवढें चिंतनाचें बळ । एका जनार्दनीं कृपाळ । यम काळवंदी सकळ । नामचिंतनीं सर्वदा ॥४॥