भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिंतन तें हरिचरण । हेंचि कालीमाजींप्रमाण । सर्व पुण्याचें फल जाण । नामस्मरण विठ्ठल

chintan ten haricharan | henchi kalimajimpraman | sarva punyachen phal jan | namasmaran viththal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चिंतन तें हरिचरण । हेंचि कालीमाजींप्रमाण । सर्व पुण्याचें फल जाण । नामस्मरण विठ्ठल ॥१॥ मागें तरले पुढे तरती । याची पुराणीं प्रचिती । वेद शास्त्र जया गाती । श्रुतीहि आनंदें ॥२॥ हेंचि सर्वांशी माहेर । भुवैकुंठ पंढरपुर । एका जनार्दनीं नर । धन्य जाणा तेथीचे ॥३॥