भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिंतन चित्ताला । लावी मनाच्या मनाला

chintan chittala | lavi manachya manala

रचनाकार: संत सेना · अभंग
चिंतन चित्ताला । लावी मनाच्या मनाला ॥१॥ उन्मनी सुखांत। पांडुरंग भेटी देत ॥२॥ ऐसा आहे श्रेष्ठाचार। वेद शास्त्राचा निर्धार ॥३॥ कवटाळूनि पोटी । सेना म्हणे सांगूं गोष्टी ॥४॥