भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिमणाचि देखिला परि हा वाड झाला । गगनहि फांकला प्रकाश वरी

chimanachi dekhila pari ha vad jhala | gaganahi phankala prakash vari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
चिमणाचि देखिला परि हा वाड झाला । गगनहि फांकला प्रकाश वरी ॥१॥ भरोनियां दाही दिशा कोंदाटला । पाताळा वरिही गेला पदांकु याचा ॥२॥ स्वर्ग माळा अंगी लेईला सुढाळ । कान्हो चक्रचाळ पंढरीचा ॥३॥ निळा म्हणे दिसे ईटेच्या नेहटीं । परी हा व्यापुनी सुष्टीं येथें उभा ॥४॥