भजनी मालिका
← भजनांकडे परत

चतुर्भुज श्याममुर्ति । शंखचक्र ते शोभती । पीतांबर वैजयंती । रुळती गळां

chaturbhuj shyamamurti | shankhachakra te shobhati | pitambar vaijayanti | rulati galan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चतुर्भुज श्याममुर्ति । शंखचक्र ते शोभती । पीतांबर वैजयंती । रुळती गळां ॥१॥ देव देखिला देखिला । तेणें संसाराचा ठावो पुशिला । विदेही तो भेटला । भक्त तयातें ॥२॥ दोघा होतांचि मिळणी । नुरे देव भक्तपणीं । फिटली आयणी । सर्व कोड कठीण ॥३॥ छंद पाहिजे नामाचा । निश्चयो काया मनें वाचा । एका जनार्दनीं त्याचा । देव होय अंकित ॥४॥