भजनी मालिका
← भजनांकडे परत

चरणांची थोरी । जाण गौतम सूंदरीं

charananchi thori | jan gautam sundarin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चरणांची थोरी । जाण गौतम सूंदरीं ॥१॥ हृदयाची थोरी । भक्त जाणती परोपरी ॥२॥ करांची ती थोरी । जाणे सुदामा निर्धारी ॥३॥ समचरणींची शोभा । एका जनार्दन उभा ॥४॥