भजनी मालिका
← भजनांकडे परत

चरणाची सेवा आवडी करीन । कायावाचामन धरुनी जीवीं

charanachi seva avadi karin | kayavachaman dharuni jivin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चरणाची सेवा आवडी करीन । कायावाचामन धरुनी जीवीं ॥१॥ यापरतें साधन न करीं तुझीं आण । हाचि परिपुराण नेम माझा ॥२॥ एका जनार्दनीं एकत्वें पाहिन । ह्रुदयीं ध्याईन जनार्दन ॥३॥