भजनी मालिका
← भजनांकडे परत

चंद्रभागे तीरीं समपदीं उभा चैतन्याचा गाभा पाडुरंग

chandrabhage tirin samapadin ubha chaitanyacha gabha padurang

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चंद्रभागे तीरीं समपदीं उभा चैतन्याचा गाभा पाडुरंग ॥१॥ कांसे पीतांबर गळा तुळशीहार । पदक हृदयावर वैजयंती ॥२॥ एकाजनार्दनीं लावण्य साजिरें । रुप ते गोजिरें विटेवरी ॥३॥