भजनी मालिका
← भजनांकडे परत

चंद्र पौर्णिमेचा शोभते गगनीं । तैसा मोक्षदानी विटेवरी

chandra paurnimecha shobhate gaganin | taisa mokshadani vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चंद्र पौर्णिमेचा शोभते गगनीं । तैसा मोक्षदानी विटेवरी ॥१॥ बाळ सुर्य सम अंगकांती कळा । परब्रह्मा पुतळा विटेवरी ॥२॥ मृगनाभी टिळक मळवटीं शोभला । तो घननीळ सांवळा विटेवरी ॥३॥ एका जनार्दनीं ध्यानाचें ध्यान । तें समचरण विटेवरी ॥४॥