भजनी मालिका
← भजनांकडे परत

चालतां मारगीं फुटतसे वाट । मागतो वो भाट सहजीं होय

chalatan maragin phutatase vat | magato vo bhat sahajin hoy

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चालतां मारगीं फुटतसे वाट । मागतो वो भाट सहजीं होय ॥१॥ तैसें नोहे संतमार्गाचें लक्षण । चालत मागुन आले सर्व ॥२॥ नोहे गुंतागुंती चुकीचा बोभाट । मार्ग आहे नीट संतसंग ॥३॥ एका जनार्दनीं सांपडलें सहज । तेणे जाहलें काज सरतें माझें ॥४॥