भजनी मालिका
← भजनांकडे परत

चलारे वैष्णवलो जाऊ पंडरीयेसी

chalare vaishnavalo jau pandariyesi

रचनाकार: संत सोपान · अभंग
चलारे वैष्णवलो जाऊ पंडरीयेसी । प्रेमामृत खुण मागो त्या विलासी ॥१॥ चालिले गोपाळ वाहताती वाकुल्या । भरले प्रेमरसे मग ते वाताती टाळीया ॥२॥ दिंड्या गरूडटके मृदंगाचे नाद । गाताती विठ्ठलनाम करिताती आल्हाद ।।३।। प्रावले पंढरी भीमा देखीयेली दृष्टी । वैष्णवांवा गजरू आनंदे हेलावली सृष्टी ॥४॥ गजरू गोपाळांचा श्रवणी पाडेयेला । शंखचक्र करी विठ्ठल सामोरा आला ॥५॥ कासवदृष्टी न्याहाळीतु रंगी नाचतु पै उगला । सोपान म्हणे आम्ही वाळवंटी केला काला ॥६॥