भजनी मालिका
← भजनांकडे परत

चाल म्हणसी बाईगे खेळों लपंडाई । जेथें तेथें साक्ष कान्हा लपो कोणें ठाई

chal mhanasi baige khelon lapandai | jethen tethen saksha kanha lapo konen thai

रचनाकार: संत निळोबा · अभंग
चाल म्हणसी बाईगे खेळों लपंडाई । जेथें तेथें साक्ष कान्हा लपो कोणें ठाई ॥१॥ झाकुनियां डोळा गे लपविली चपळा । लेपों जाति जेथें तेथें कलकलिती बाळा ॥२॥ पडसाई नसे गे अवघाचि प्रकाशे । सर्वठाई व्यापूनि आत्म वनमाळि वसे ॥३॥ निळा म्हणे खेळगे अवघाचि हो पळ । जेथें तेथें साक्षपणें वतें हा गोपाळ ॥४॥