भजनी मालिका
← भजनांकडे परत

चहुं वाचांपरता चहुं वेदां निरुता । न कळे तत्त्वतां चतुर्वक्त्रा

chahun vachamparata chahun vedan niruta | na kale tattvatan chaturvaktra

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चहुं वाचांपरता चहुं वेदां निरुता । न कळे तत्त्वतां चतुर्वक्त्रा ॥१॥ चौबारा खेळतु सौगंडी सांगातु । लोणी चोरुं जातु घरोघरीं ॥२॥ चौसष्ट वेगळा चौदांसी निराळा । अगम्य ज्याची लीळा सनकादिकां ॥३॥ एका जनार्दनीं चहुं देहावेगळा । संपुष्टी आगळा भरला देव ॥४॥