भजनी मालिका
← भजनांकडे परत

चाडियामुखें दाणा पडे । तरि तो निवडे कणभारें

chadiyamukhen dana pade | tari to nivade kanabharen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
चाडियामुखें दाणा पडे । तरि तो निवडे कणभारें ॥१॥ तैसें कडवळ फोकिलें नोव्हे । सोपटाचि राहे वाढोनियां ॥२॥ सद्गुरुमुखींचें वचन । पाववी निस्थानपदातें ॥३॥ वाचाळ ज्ञानें ऐकतां गौष्टी । वाउग्याचि शेवटीं भरोवरी ॥४॥ निळा म्हणे सांप्रदाय शुध्द । उपजवी बोध गुरु शिष्या ॥५॥