भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रम्हीभूत होते काया । श्रीहरि पायां अनुसरतां

bramhibhut hote kaya | shrihari payan anusaratan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ब्रम्हीभूत होते काया । श्रीहरि पायां अनुसरतां ॥१॥ परि हा विश्वास नुमटे मनीं । जाती म्हणऊनि निरया गांवां ॥२॥ जिहीं केला हा सायास । पावले पदास ते संत ॥३॥ निळा म्हणे अनुभवसिध्द । ऐसा प्रसिध्द कलियुगीं ॥४॥