भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्मीहून चंचले । त्या प्रयत्न न चले

brahmihun chanchale | tya prayatna na chale

रचनाकार: संत महंमद · अभंग
ब्रह्मीहून चंचले । त्या प्रयत्न न चले । मुरडिती सिनले । साधुसंत ॥१॥ मुरडितां मुरडे नाधेति त्या आघाटि । पाडति आव्हांटि । चौऱ्यासिस ॥२॥ धरूनिया बिज उगवति पडति । जन्म मरण सुति । फेरा त्यांला ॥३॥ भाजीलीयां बिज मग वे उगवेना । म्हणोनि धरि जना साधु संग ॥४॥ सदगुरुचे संगति होय ब्रह्म प्राप्ति । सेख महमद पाई प्रीति पद्मनामा ॥५॥