भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्मांडांचा धनी । तो संतीं केला ऋणी

brahmandancha dhani | to santin kela runi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ब्रह्मांडांचा धनी । तो संतीं केला ऋणी ॥१॥ म्हणोनि नाचे मागें मागें । वाहें अंगें भार त्याचा ॥२॥ सांकडें पडुं नेदी कांहीं व्यथा । आपणचि माथां वोढवी ॥३॥ एका जनार्दनीं संत । त्रैलोक्यांत मुकुटमणी ॥४॥