भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्माज्ञानासाठीं । हिंडताती पाठोपाठीं

brahmadnyanasathin | hindatati pathopathin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ब्रह्माज्ञानासाठीं । हिंडताती पाठोपाठीं ॥१॥ नोहे नोहें बा फुकांचें । बोल बोलतां नये सांचें ॥२॥ ऐसें आहे तैसें आहे । वाउगा तो भ्रम पाहे ॥३॥ जनार्दन कृपा पुर्ण । तैंचि कळे ब्रह्माज्ञान ॥४॥ एका जनार्दनीं शरण । चालुन येईल ब्रह्माज्ञान ॥५॥