भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलू नयें तें आले बोला । आमुचा बाप गरवार जाला

bolu nayen ten ale bola | amucha bap garavar jala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बोलू नयें तें आले बोला । आमुचा बाप गरवार जाला ॥१॥ नवलही ऐकिलें ऐका जी तुम्ही चोज । ऐकूं जातां तोचि नाचे भोजें ॥२॥ प्रौढ जाली आमुची आईं । बापाची नांवें त्या ठेविलीं पाहीं ॥३॥ लेकीनें बापासी केलें सावेव । एका जनार्दनीं पहा नवलाव ॥४॥