भजनी मालिका
← भजनांकडे परत

भुक्ति मुक्तीचें कारण । नाहीं नाहीं आम्हां जाण

bhukti muktichen karan | nahin nahin amhan jan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भुक्ति मुक्तीचें कारण । नाहीं नाहीं आम्हां जाण ॥१॥ एक गाऊं तुमचें नाम । तेणें होय सर्व काम ॥२॥ धरलिया मूळ । सहज हातीं लागे फळ ॥३॥ बीजाची आवडी । एक जनार्दनीं गोडी ॥४॥