भजनी मालिका
← भजनांकडे परत

भीवरेचे तीरीं उभा । धन्य शोभा विठ्ठल

bhivareche tirin ubha | dhanya shobha viththal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भीवरेचे तीरीं उभा । धन्य शोभा विठ्ठल ॥१॥ विटेवरी समचरण । तेथें मन गुंतलें ॥२॥ संत जाती तया ठाया । मजहि गांवा त्वां न्यावें ॥३॥ उपकार करा साचा । दाखवा दीनाचा सोयरा ॥४॥ एका जनार्दनीं बापमाय । वंदू पाय तयाचें ॥५॥