भजनी मालिका
← भजनांकडे परत

भिंगाचे भिगुलें खांद्यावर आंगुलें । नाचत तान्हुलें यशोदेचें

bhingache bhigulen khandyavar angulen | nachat tanhulen yashodechen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भिंगाचे भिगुलें खांद्यावर आंगुलें । नाचत तान्हुलें यशोदेचें ॥१॥ येती गौळणी करीती बुझावणी । लागती चरणी कान्होबाच्या ॥२॥ गोविंद बाळिया वाजविती टाळिया । आमुचा कान्हया देवराज ॥३॥ कडदोरा बिंद्ली वाघनखें साजिरी । नाचत श्रीहरी यशोदेचा ॥४॥ पायीं घागरीया वाक्य साजरीया । कानीच्या बाळ्या ढाळ देती ॥५॥ एका जनार्दनी एकत्व शरण । जीवें निबंलोण उतरती ॥६॥