भजनी मालिका
← भजनांकडे परत

भिक्षेलागीं पाणीपात्र । सांठवण उदर मात्र

bhikshelagin panipatra | santhavan udar matra

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भिक्षेलागीं पाणीपात्र । सांठवण उदर मात्र ॥१॥ सायंकाळीं प्रातःकाळासी । भिक्षा संग्रह नसावा निश्चयेंसी ॥२॥ संग्रह यत्‍नाचीया चाडा । मोहोळ अवघा कडा ॥३॥ मोहोळ झाडितां त्यासी । नाश होतो मासीयासी ॥४॥ सर्व मायीक पदार्थ । एका जनार्दनीं परमार्थ ॥५॥