भजनी मालिका
← भजनांकडे परत

भी नेणे ती भक्ति नेणे त्या मुक्ति

bhi nene ti bhakti nene tya mukti

रचनाकार: संत सोपान · अभंग
भी नेणे ती भक्ति नेणे त्या मुक्ति । तुझ्या नामपंथी मार्गु मना ॥१॥ हेचि मज चाड न करि मी आशा । तुज हषीकेशा चितितुसे ।।२। तूची माझे धन जोडी हे निजाची । जननी तू आमुची जीवलगे ।।३।। सोपान म्हणे तुजविण न कळे । तुजमानी सोडळे मने केले ॥४॥