भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाविकांसी नित्य नवें हें सोपारें । पंढरी उच्चार करितां वाचें

bhavikansi nitya naven hen soparen | pandhari uchchar karitan vachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भाविकांसी नित्य नवें हें सोपारें । पंढरी उच्चार करितां वाचें ॥१॥ हो कं अनामिक अथवा शुद्ध वर्ण । ज्ञातीसी कारण नाहीं देवा ॥२॥ एका जनार्दनीं भलती ज्ञाती असो । परी पांडुरंग वसो हृदयमाजीं ॥३॥